मलवडी तालुका फलटण येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण उसात संपन्न.
*हनुमान जयंती निमित्त मलवडी तालुका फलटण येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण उत्साहात संपन्न.* सातारा 24 तास न्यूज फलटण तालुका प्रतिनिधी शकील सय्यद.
मलवडी तालुका फलटण येथे हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण उत्साहात संपन्न झाला.
रामनवमी ते हनुमान जयंती या पर्व काळावर अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करण्यात आले आज सकाळी बरोबर सहा वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरामध्ये अतिशय आनंददायी वातावरणामध्ये दिंडीने ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली. दिंडी मध्ये बालवीर वारकरी टाळकरी ग्रामस्थ सर्वजण आती उत्साहाचे आनंदाचे वातावरणामध्ये सहभागी झाले . प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पालखी सोहळा मध्यवर्ती ठिकाणी आला त्यानंतर बरोबर सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत काल्याचे किर्तन हरिभक्त पारायण अशोक महाराज हुंबे यांचे संपन्न झाले .त्यानंतर गावातील परिसरातील पंचक्रोशीतील सर्वांनी काल्याच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. आणि अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment