वाखरी तालुका फलटण येथील काही समाजातील ग्रामस्थ यांना वाळीत टाकलेने फलटण तहसील कार्यालय समोर केले साखळी उपोषण.
वाखरी तालुका फलटण येथील काही समाजातील लोकांना वाळीत टाकलेने तहसील कार्यालय फलटण समोर केले साखळी उपोषण.
सातारा 24 तास न्यूज. जिल्हा संपादक रणधीरजी भोसले.
वाखरी तालुका फलटण येथील ग्रामपंचायत वाखरी यांची विशेष ग्रामसभा गुरुवार दि. 14/4/20 22 रोजी घेण्यात आली असून ठराव क्रमांक आठ ची नक्कल प्रमाणे. वाखरी तालुका फलटण येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर देवस्थानी जत्रा सालाबादप्रमाणे दरवर्षी भरली जाते. सदर जत्रेत गावातील सर्व समाजातील काही वाळीत टाकलेल्या बांधवांना जत्रेत समाविष्ट करण्यात यावे. त्याच बरोबर ग्रामदैवत भैरवनाथ जत्रा ग्रामपंचायतीमार्फत आयोजित करण्यात यावी. व तेथील पंच कमिटी म्हणून सरपंच उपसरपंच. ग्रामपंचायत सदस्य यांना जत्रा कमिटी म्हणून परवानगी मिळण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करण्यात यावी. व पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात शासकीय महापूजेचा मान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना राहतो. त्याचप्रमाणे गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर येथील जत्रेचा व पूजेचा विधीचा मान हा सरपंचांना मिळावा याची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात यावे असे श्री. तुकाराम बापूराव शिंदे व अनुप दिलीप गायकवाड यांनी केली. ग्रामदैवत भैरवनाथ जत्रेत सर्वांचा समावेश करण्यात यावा असे देखील या ठराव माध्यमातून मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार चर्चा करण्यात येऊन याप्रमाणे वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करण्यात यावी असे ठराव करण्यात आले. त्या विशेष सभेत मान्यता मंजूर करून देखील विचार न झाल्याने. वाखरी येथील सर्व समाजातील वाळीत टाकलेल्या ग्रामस्थ यांनी जिल्हाअधिकारी यांनादेखील निवेदन देण्यात आले.साखळी उपोषण हे मा. तहसील कार्यालय फलटण समोर करण्यात आले. वाळीत टाकलेला प्रकार हा सातारा जिल्ह्यातील पहिला घडलेला प्रकार उघड झाला आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की. आम्ही सह्या करणारे सर्व ग्रामस्थ मौजे वाखरी तालुका फलटण येथील कायमचे रहिवासी असून आम्हा सर्वांची राहते घरे व शेत जमिनी आहेत. वाखरी गावामध्ये पूर्वपार भैरवनाथ ग्रामदैवत मंदिर असून दरवर्षी भैरवनाथ ग्रामदैवताची जत्रा भरवण्यात येते. या जत्रेनिमित्त कुस्त्या. तमाशा. देवाचे लग्न. बैलगाडा शर्यती. देवाचा भंडारा. ऑर्केस्ट्रा. देवाचा छबिना. त्याच बरोबर देवाची पालखी काढली जाते. या जत्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. अशाप्रकारे वाखरी येथे भैरवनाथ जत्राही पाच दिवस भरवण्यात येत असते. परंतु वाखरी गावची पंचकमिटी 20 वर्षापेक्षा जास्त काळ जत्रा कमिटी म्हणून कामकाज पाहत असलेली कमिटीतील पंच रामभाऊ नाथा ढेकळे. राजेंद्र भगवान तांबे. भैरवनाथ आनंदराव ढेकळे. दादा बापूराव ढेकळे. दत्तात्रय मारुती ढेकळे. आनंदा बबन मोहिते. तुकाराम मारुती सुतार. वैभव जगन्नाथ धायगुडे. तुकाराम विनायक गरड. युवराज ज्ञानदेव जाधव सर्व राहणार वाखरी तालुका फलटण असे पंच कमिटी सदस्य म्हणून कामकाज पाहत आहेत. सर्व पंच कमिटी सदस्य यात्रे करता दरवर्षी गावातून वर्गणी जमा करून जत्रा भरवत असतात. परंतु आम्ही सर्वजण त्या कमिटीकडे जाऊन वारंवार विनंती केली असता. वाळीत टाकलेल्या ग्रामस्थांची वर्गणी घेतली जात नाही. व आम्हा सर्वांना जत्रेमध्ये समाविष्ट करून घेतले जात नाही. त्या कारणास्तव पंच कमिटीकडे अनेक वेळा जाब विचारला असता त्यांनी आम्हाला पष्ट पणे सांगितले की आम्ही तुम्हाला वाळीत टाकले आहे. आम्ही तुमची वर्गणी घेणार नाही आणि जत्रेत देखील तुम्हाला समाविष्ट करून घेणार नाही. तुम्ही जर जत्रेत आला तर तुमच्याकडे आम्ही बघून घेऊ आम्ही वाखरीगाव चे प्रमुख असल्याचे सांगत आम्ही तुम्हाला पूर्णपणे वाळीत टाकले आहे. त्यामुळे तुम्ही जत्रेत सामील व्हायची भाषा सुद्धा करायची नाही. असाही पंच कमिटीकडून दम देण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगत आहे. तुम्हाला आमचे काय वाकडे करायचे आहे ते करा. आमचं काहीच वाकड करू शकत नाही तुम्ही असे प्रकार दमबाजी करण्यात येत आहे. आम्ही वाळीत टाकलेले सर्व समाजातील ग्रामस्थ हे कायमस्वरूपी पिढ्यान् पिढ्या वाखरी गावात राहात आहोत. आणि आम्हा सर्वांचा ग्रामदैवत जत्रेतील धार्मिक अधिकार आहे. व त्या अधिकाराचे पंच कमिटी सदस्यांनी उल्लंघन करून बेकायदेशीर रीत्या आम्हा सर्वांच्या बरोबर वागत आहेत. त्यामुळे आम्ही आम्हा सर्वांवर होणारा अन्याय त्याबाबत न्याय हक्कासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे दात मागणीकरिता साखळी उपोषणास बसलो असल्याचे वाखरी ग्रामस्थ यांच्याकडून सांगण्यात आले.
Ya gramastanna nay milto ki nahi yachi pn mahiti sanga
ReplyDelete