किल्ले वर्धनगड येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण उत्साहपूर्ण वातावरणात सुरू.
सातारा 24 तास न्यूज
सलग दोन वर्ष कोरोना महामारी ने जगभरामध्ये थैमान घातले होते. अशा भयानक महा मारीला सर्वांना सामोरे जावे लागले. त्यामुळे सांप्रदायिक कार्यक्रम. यात्रा जत्रा सलग दोन वर्ष शासनाने घालून दिलेले निर्बंधाचे पालन केलेने. कोणत्याही प्रकारे कार्यक्रम करता आली नाहीत. सद्यस्थितीमध्ये शासनाने लागू केलेले निर्बंध पूर्णपणे हटवलेने श्री गुरुवर्य ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांच्या आशीर्वादाने किल्ले वर्धनगड येथे आज 16/4 /20 22 रोजी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुरू करण्यात आले. आजच्या विज्ञान युगात मनुष्य हा परमार्था पासून उंचीत झाला असून. व भौतिक सुखाच्या साधनांनी अध्यात्मिक समाधानात आणि आनंद गमावून बसला आहे. त्यांच्या जीवनात आनंदाची फुलबाग फुलविण्यासाठी व भक्तीचा फुलोरा बांधण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून ब्रह्यानंदाचा आनंद लुटण्यासाठी किल्ले वर्धनगड व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊन श्रवण सुखाचा आनंद घ्यावा. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी! कृपा करी हरी तयावरी!! नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी! एक तरी ओवी अनुभवावी!! तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम! धन्य तुकोबा समर्थ! जेणे केला हा पुरुषार्थ. अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी व्यासपीठ: ह.भ.प.भानुदास महाराज वाघ. ह.भ.प.डॉ. शंकर महाराज कदम. गायनाचार्य: अशोक महाराज मंडलापुरकर. तबला साथ: ह.भ.प.लखन महाराज यादव. संतोष महाराज साळुंखे, रघुनाथ महाराज कदम. मृदुंगाचार्य: ह.भ.प.चंदू महाराज लांडे. वैभव महाराज सावंत. चोपदार ह-भ-प दिलीप महाराज गायकवाड. हार्मोनियम: ह-भ-प शंकर महाराज घोरपडे. शंकर महाराज शिंदे. सर्जेराव महाराज पवार. नारायण महाराज पाचांगणे. मोहन महाराज पवार. सिंग वादन सुधीर महाराज शेंडे पुजारी. विणेकरी: ह.भ.प सर्जेराव महाराज घोरपडे. हिंदुराव महाराज खवळे. टाळकरी: भजन मंडळ वर्धनगड. प्रवचनकार: ह भ प डॉ. शंकर महाराज कदम. ह भ प सौ. आशा महाराज गायकवाड. ह भ प प्रविण महाराज जाधव. ह भ प नितीन महाराज घोरपडे. ह भ प डॉ. प्रदीप कुमार महाराज देशमुख. त्याचबरोबर कीर्तनकार ह-भ-प दत्तात्रय महाराज फरांदे निंबुद. ह भ प अंकुश महाराज कदम गोडसेवाडी. ह भ प केशव महाराज मुळीक बारामती. ह भ प आझाद महाराज गुजर सातारा, ह भ प एकनाथ महाराज सदगीर ठाणे. ह भ प दशरथ महाराज मानकर मुळशी पुणे. ह भ प संस्कार महाराज खंडागळे.संयोजक: ग्रामस्थ किल्ले वर्धनगड स्पीकर व्यवस्था जनता साऊंड सर्विस वर्धनगड या सर्वांनी आपली जबाबदारी स्वीकारत सप्ताहातील दैनंदिनी कार्यक्रम रोज पाटे4.30ते 6.30 काकड आरती 8ते 10 व दुपारी3 ते 5 ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सायं. 5 ते 6 प्रवचन.6.30 ते 7.30 हरिपाठ व रात्री 9ते 11 किर्तन व त्यानंतर भजनी मंडळाचा जागर त्यानंतर दि. 22/4 /2022 रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाची सांगता होईल. दि.23/4/2022 रोजी ह.भ.प.बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांचे काल्याचे किर्तन त्याचबरोबर दिंडी सोहळा संपन्न होणाऱ आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा.
Comments
Post a Comment