सोमनथळी येथील दक्षिणमुखी स्वयंभू श्री हनुमान जयंतीनिमित्त होणार अनेक विविध कार्यक्रम.

*सोमनथळी येथील दक्षिणमुखी स्वयंभू श्री हनुमान जयंती निमित्त होणार अनेक विविध कार्यक्रम*
 सातारा 24 तास न्यूज फलटण शहर (प्रतिनिधी)बबनराव मदने. 
सोमंथळी (ता. फलटण) येथील दक्षिणमुखी स्वयंभू श्री हनुमान मंदिर हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या मारुतीला नवश्या मारुती म्हणूनही संबोधले जाते. आज (ता.१६ )हनुमान जयंती उत्सवानिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्याचा पूर्व - उत्तर भाग (फलटण माण) पूर्वी दंडकारण्यात मोडत होता. रावणाची सत्ता मोडीत काढून विजय मिळविल्यानंतर प्रभू रामचंद्रअयोध्येत परतले.आयोध्येतील जनतेने सीतेच्या चारित्र्यावर संशय घेतला त्यामुळे दुःखी होऊन प्रभू रामचंद्राने सीतेचा त्याग केला.
   रामाने त्याग केल्यानंतर सितामातेने फलटण- माण( पूर्वीचे दंडकारण्य) वास्तव्य केल्याची आख्यायिका सांगितली जाते.त्यानुसार या परिसरात सितामातेने एका पर्णकुटीत वास्तव्य केले. याच ठिकाणी सितामातेने लव व कुश यांना जन्म दिला. कालांतराने रामाने अश्वमेघ यज्ञ केला व जग जिंकण्यासाठी घोडा सोडला होता. तो घोडा फलटण पुर्व भागात लव व कुश या दोघांनी अडविला होता. त्या घोड्याला सोडविण्यासाठी रामाने भरत, शत्रुघन, लक्ष्मण यांना पाठविले; परंतु तेही या बालकांसमोर पराभूत झाले. ही वार्ता रामाला समजताच रामाने हनुमानास बोलवले. त्या ठिकाणी हनुमान आल्यानंतर सैनिकांनी घोडा  सोडविण्यास सांगितले हेके खोर लव-कुशने घोडा सोडविण्यास नकार दाखविला व हनुमानास युद्धाची चिथावणी दिली. हनुमंताने युद्धाची तयारी केली व गदा रुपी अस्त्र उचलले असता ती दोन बालके रामरूपी दिसू लागली. त्यामुळे हनुमंताने त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन हात जोडले. त्यावेळी लव-कुश यांनी हनुमंतास सोमंथळी येथील सोमरस या लिंबाच्या झाडाला बांधले.  त्या ठिकाणी स्वयंभू हनुमानाची दक्षिणमुखी मूर्ती प्रकट झाली.सोमंथळी येथील महिला शेणाच्या गोवऱ्या गोळा करीत असताना एका शेणाच्या गोवरीखाली त्यांना एक लाल रंगाचा कोंब दिसून आला. गावकर्‍यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांच्या लक्षात आले, की त्या ठिकाणी साक्षात हनुमान प्रकट झाले आहेत. कालांतराने त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आले. त्या मंदिराचा पाया १८ फूट खोल नेण्यात आला होता. सोमरस या लिंबाच्या झाडा वरून ब्रिटिश काळात सोमंथळी हे नाव उदयास आले. सोमंथळी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर फलटण येथील राम मंदीर व सीतामाईच्या डोंगरावरील मंदिर हे एका सरळ रेषेत येतात हे खास वैशिष्ट्य आहे.सोमंथळी येथील हे दक्षिण मुखी स्वयंभू श्री हनुमान मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते या हनुमानाच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे, सोलापूर, पंढरपूर, सातारा, बारामती तसेच दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. २०१० पासून प्रत्येक शनिवारी प्रवचन व कीर्तनाचे आयोजन करण्यात येते. ग्रामस्थांमार्फत फराळाचे वाटपही करण्यात येते. यात्रेच्या आठ दिवस अगोदर सप्ताह  असतो. या दक्षिणमुखी मंदिराचा जन्म पौर्णिमेला झाला असल्याने दर वर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती उत्सव साजरा करण्याची परंपरा चालत आली आहे. ती ग्रामस्थांनी तशीच परंपरागत चालू ठेवली आहे. आज (ता. १६) पहाटे चार ते सहा या वेळेत संगीत व भजन ,६ वाजून १३ मिनिटांनी गुलाल पुष्पवृष्टी करून हनुमान जन्मोत्सव ,आठ वाजता प्रवचन  ,आठ ते नऊ या वेळेत गाव प्रदक्षिणा, दुपारी तीन ते सहा कावडी ,काठी मिरवणूक सहा ते सात हरिपाठ श्रींची प्रदक्षणा, सात ते अकरा श्रींचा छबिना मिरवणूक होणार आहे .
  रविवारी (ता. १७) सकाळी दहा ते तीन पर्यंत लोकनाट्य तमाशा कार्यक्रम व दुपारी चार ते सहा या वेळेत जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे या हनुमान जन्मोत्सवाचा लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावा, असे आव्हान यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.