नितीन गडकरी राज ठाकरेंना भेटले, दोन तसांच्या भेटींनंतर बोलले........

*नितीन गडकरी राज ठाकरेंना भेटले, दोन तासांच्या भेटीनंतर बोलले*...
: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरीयांनी राज ठाकरेंची  आज मुंबईत भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी नितीन गडकरी भेट घेतली. जवळपास दोन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी १० वाजेच्या सुमारास पोहोचले. यानंतर गडकरी हे १२ वाजेच्या सुमारात राज यांच्या घरातून बाहेर पडले. यानंतर नितीन गडकरी यांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली.
ही राजकीय भेट नव्हती. माझे आणि ठाकरे परिवारासोबत आमचे कौटुंबीक संबंध आहेत. त्यांच्या आईची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो आणि नवीन घर पाहण्यासाठी भेट दिली. ही पूर्णपणे वैयक्तिक भेट होती. आजच्या भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. आणि कुठलाही राजकीय हेतू नाही, असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.
नितीन गडकरी यांनी ठाकरे कुटुंबासोब जेवण केलं. यावेळी अमित ठाकरे यांच्यासह राज ठाकरे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य होते. यावेळी कौटुंबीक चर्चा झाली. जेवणानंतर नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्यामध्ये वैयक्तिकरित्या जवळपास पाउण तास राजकीय चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण चर्चेचा तपशील कळू शकलेला नाही. नितीन गडकरी यांनी ही वैयक्तिक भेट असल्याचं म्हटलं असलं तरी भेटीच्या टायमिंगवरून जोरदार चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. या मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी नितीन गडकरींनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने आता राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.