सातारा 24 तास न्युज

कोरेगाव नगरपंचायतीच्या पायाभूत सुविधांचा लेखा जोखा 
सातारा 24 तास प्रतिनिधी. निसार शिकलगार. कोरेगाव शहर दिवसेंदिवस विस्तारत चालले आहे. त्यामुळे घनकचर्याची समस्या गंभीर वळण घेत आहे. पुर्वी प्रभागामध्ये सिमेंटच्या मोठ्या कुंड्या ठेवुन त्यात कचरा साठवला जाई.नंतर कचरा  सफाई कामगाराकडून ट्रक्टर ट्रालीतून डंपींग डेपोत खाली केला जात असे.  शासन घनकचर्याच्या बाबतीत अंत्यत  संवेदनशील असून, त्यासाठी सकारात्मक पाऊल टाकत आहे. सुका व ओला कचरा वेगळा करायला सांगून ,स्वराज्य संस्थांना खत प्रकल्प उभारणी साठी मोठं प्रोत्साहन देत आहे. अनेक ठिकाणी असे प्रकल्प कार्यान्वित करण्यातआले आहेत.
कोरेगाव नगरपंचायतीने  घनकचरा व्यवस्थापनाकरिता टेंपोतून ओला व सुका कचरा नेण्याची सोय होत केली आहे. विविध प्रभागामधून रोज सकाळी घनकचरा उचलला जाणे अपेक्षित असते परंतु, यातही नियमितपणा दिसून येत नाही.अनायासे मग लोकं साठलेला कचरा जवळपासच रस्त्याच्या कडेला टाकतात. शांतीनगर, आझाद चौकातील मंडई, नगरपंचायतीपासून  हाकेच्या अंतराजवळ असणार्या बाजारतळाजवळील ओढ्याचा भाग. अशा एक ना अनेक ठिकाणी सर्वत्र कचरा विखुरलेल्या  अवस्थेत दिसून येत असतो. हाच कचरा गाई गुरेखातात,जलस्त्रोतही हाच कचरा मिसळला जातो. ही बाब जशी माणसाला आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे तशी ती पशू -पक्षांनाही आहे. कोरेगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून कचरा  वेळेत न उचलल्या कारणाने स्वतः नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी नगरपंचायतीच्या समोर कचरा टाकून निषेध व्यक्त केला. हे उदाहरण अगदी ताजे आहे. 
यावरून असे दिसकी,घनकचर्याचे व वेळेचे योग्य नियोजन नाही. त्याचबरोबर यामध्ये कमालीचा अनियमित पणा दिसून येत आहे. याच कारणामुळे  कोरेगाव मधील महिला वर्ग  घनकचार्याच्या  व्यवस्थापनबाबतीत असून अडचण नसून खोळंबा असे सहजपणाने बोलू लागल्या 
आहेत. कोरेगाव शहरातील गोळा केलेला घनकचरा एमआयडीसी च्या समोरील बर्गे यांच्या क्रशर मागील मोकळ्या जमिनीवर टाकला जातो.अनेक वेळा हा कचरा, कचरा वेचकाकडून जाळला जातो व किमान एक ते दिड कि.मी.पर्यंत पसरलेल्या धुराचा आणि दुर्गंधीचा त्रास तेथील शेकडो रहिवास्यांना सोसावा लागतो. वास्तविक घनकचरा व्यवस्थापन करताना, कोरेगाव नगरपंचायतीने शासनाच्या अटी व नियमांनांच तिलांजली दिली आहे. घनकचरा व्यवस्थापना  करिता नगरपंचायतीची वाहने आणि खाजगी काँन्ट्रक्टरची माणसे,  असा त्रांगडा प्रकार चालू आहे. वास्तविक ओल्या कचर्यापासून एक मोठा खत निर्मिती प्रकल्प उभा राहू शकतो परंतु, त्याबाबत नियोजनाचाअभाव,नगरपंचायतीचे घनकचरा व्यवस्थापनाकडे सततचे दुर्लक्ष हेच वास्तव आहे. स्वच्छ कोरेगाव!सुंदर कोरेगाव!!अशा सुरूवातीस चकपकीत वाटणार्या  घोषणा ,आज मात्र त्याच घोषणा वापरून - वापरून गुळगुळीत झाल्या आहेत काय असे वाटते.वास्तविक पाहता कोरेगावची  बकाल कोरेगाव अशी नव्याने ओळख होऊ लागली आहे हे मात्र निश्चित.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.