सातारा 24 तास
![]() |
हेडिंग.. वणवा रोखणे एक सामाजिक जबाबदारी :वनरक्षक बिरू जावीर
सातारा 24 तास . प्रतिनिधी. अकबर भालदार.
वडूज (खटाव ) वनपरिक्षेत्र अधिकारी सौ शितल फुंदे मॅडम. वनपाल वडूज रामदास गावटे. यांच्या नेतृत्वाखाली वन वनवा संदर्भात वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत असणारे वनक्षेत्रात वनवे लागू नयेत म्हणून संपूर्ण गावातून वन वणवा रोखण्याची जबाबदारी समजत जनजागृती करण्यात आली. यावेळी नियत क्षेत्र पुसावळी येथील संपूर्ण वनक्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये जनजागृती करतेवेळी वनरक्षक जावीर बिरो आपले मनोगत व्यक्त करते वेळी ते पुढे म्हणाले.
मित्रांनो सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे,तसे डोंगरांना, जंगलांना आगी लावण्याचे/लागण्याचे प्रमाण वाढत आहे.
डोंगरांना आगी लावण्यामागे अनेक गैरसमज/कारणे आहेत
गवत पेटवल्याने पुढील पावसाळ्यात चांगले गवत ऊगवते म्हणून शेतकरी आग लावतात पण प्रत्यक्षात आगीमध्ये वाढलेले गवत आणि त्याचे बी पूर्णपणे जळून जाते. त्यामुळे चांगले गवत कमी कमी होत जावून तणांचीच वाढ जास्त होते.वनविभागाचे कर्मचारीरस्त्यालगत,रोपवणालगत जाळरेषा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करतात पण काही विकृती रस्त्यालगत मद्यपान, शौचविधीसाठी जंगलात जावून सिगारेट/विडी जाळून आग लावून निघुन जातात. यात जंगलातील नवीन रोपे, गवत, वन्यजीव अधिवास यांची अतोनात हानी होते.
शिकारिसाठी झुडुपे, कपारी मध्ये आग लावून वन्यजीवांना लपण क्षेत्रातून बाहेर काढून मारणेसाठी डोंगर पेटवले जातात, हे अतिशय क्रूरपणे घडते. डोंगरातून जान्यासाठी रस्ता करण्यासाठी
सरपण गोळा करण्यासाठी सोप्पे जावे यासाठी डोंगर पेटवतात. भारतीय संविधानानुसार पर्यावरण संरक्षण ही आपली जबाबदारी आहे, आपल्या पुढील पिढ्यांसाठी वने वाचली पाहिजे म्हणून निदान ज्यांना आग दिसते, जे जंगलाचे जवळ राहतात त्यांनी तरी आग विझविन्यास मदत करणे आवश्यक आहे.
मित्रांनो ,सध्या रात्रीचे ऊंचावर जावून पाहिले की चारही दिशांना कोठेना कोठे डोंगर पेटलेली दिसतात याचे दुष्परिणाम खालील प्रमाणे गुरांचा चांगला चारा नष्ट होतो नविन व जुनि रुजलेली झाडे व रोपे नष्ट होतात
वन्यप्राणी,सरपटनारेप्राणी,पक्षीजीवन, बाधित होतेजमिनीचे गवताचे आच्छादन नष्ट होते यामुळे मातीची धुप होते , पाण्याची धारण करण्याची जमिनिचि क्षमता नष्ट होते यामुळे खड़क उघडे पडतात
या प्रकारे थोड्याशा नजर चुकीमुळे व बेजबाबदार वागण्यामुळे आपण आपल्या पर्यावणाचे व सामाजिक नुकसान करत आहोत.खरतर नुसते वनखात्यावर जबाबदारी झटकुन अनेकजण वनव्याकडे दुर्लक्ष करतात. सध्या दुष्काळी परिस्थिति आहेजनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावायला लागला आहे वनखात्याच्या डोंगरात दुष्काळावर मात करेल एवढा चारा आहे. पण काही समाज विघातक प्रवृत्तीमुळे व वरील गैरसमजामुळे आपण वनव्याला बळी पडत आहोत
आग विझवू लागायला चला म्हणल्यावर आमचा काही फायदा नाही आमची गूरे नाही जात जंगलातआम्हाला नाही लागत तुमचे सरपण असे सांगून आग विझवायला यायचे टाळतात. वनखात्याचे अपुरे कर्मचारी बळ, एका कर्मचाऱ्याकडे 10 पेक्षा जास्त गावे आणि हजारो हेक्टर वनजमिन, बातमी मिळाल्यावर घटना स्थळावर जाईपर्यंत लागणारा वेळ तसेच यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नसतात. आजुबाजुला पानगळ् झाल्याने आग विझवायला पाला ही नसतो, ओल्या गोणीही फार काळ टिकत नाहीत तरीही वनकर्मचारी, पर्यावरण मित्र आपले प्रयत्न सोडत नाही, कड्या कपारीत, डोंगर उतारावर रात्रीच्या वेळी जावून आग विझविण्यासाठी जीवावर उदार होऊन काम करावे लागते. जे उपलब्ध होईल त्याने आग आटोक्यात आणतो पण तो पर्यन्त बरेच क्षेत्र जळालेले असते. आजुबाजूचे लोक आपले सामाजिक भान विसरून पाहत बसतात आणि फ़क्त रान पेटल म्हणून चर्चा करतात.
पण यापासुन आपण पुढील पिढीचा अमूल्य ठेवा नष्ट करुण पर्यावर्णाचि हानि करात आहोत हे विसरून जात आहोत.
यासाठी सर्वांनी प्रयत्न करने गरजेचे आहे.गावातील तरुणांनी पर्यावरण दलांची स्थापना करायला पाहिजे.आपला डोंगर पेटलेला दिसल्यास वनखात्याला खबर करून गावातील तरुणांनी त्वरित डोंगराकडे धाव घेवून आग आटोक्यात आनायला पाहिजे
यातून आपल्याला मिळेल चांगले जंगल आज हिवरे बाजार किंवा राळेगण सिद्धि सारखी गाव व्हावित असे प्रत्येकाला वाटते परंतु सामाजिक प्रयत्नाशिवाय् हे शक्य नाही.वणवा लागू नए म्हणून आपण खालील काळजी घ्यावी. वनालगत आपला शेतीचा बांध, शेतातील कचरा/उसाचे पाचट जाळताना प्रथम आपल्या नाजिकच्या वनाधिकारी यांना सूचना द्या. वनात फिरायला जाताना अग्निजन्य वस्तु नेवु नयेत.जंगलात किंवा जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने सिगरेट ओढु नका.कोणत्याही कारणाने आग लावायचा प्रयत्न करू नका
वनालगत असणारे शेतकरी, ग्रामस्थ यांनी वनात फिरणारे संशयास्पद इसम, टवाळखोर, शिकारी यांची खबर /माहिती वनरक्षक यांना द्यावी.
ही माहिती आपणही आपल्या मित्रांना सांगा व त्यांना पर्यावरण रक्षणात सहभागी करुण घ्या
मग पहा तुम्ही किती अप्रत्यक्ष फायदे आहेत वणानचे
जंगलात गवत किंवा झाडांची मुळे पाणी धारुण ठेवतात त्यामुळे आपल्या बोअरवेल विहीर यांना पानी वाढतेगवतामुळे डोंगराची माती वाहून जात नाही
त्यामुळे उन्हाचि तीव्रताही कमी होण्यास मदत होतेगुरांना कापून न्यायाला चारा उपलब्ध होतो
अनेक प्रकारच्या रानभाज्या खायला मिळतात पशु पक्षी यांना निवारा मिळाल्याने निसर्गचक्र सुधारते व बराच काल जंगलात पानी उपलब्ध झाल्याने
सध्या चालु असलेल्या मानव बिबट यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होईल.मित्रांनो, पर्यावरण रक्षणासाठी जंगले आगीपासून वाचवने हीसामाजिक जबाबदारी आहे.पावसाळ्यात धबधबे, हिरवा निसर्ग, कडे, फुलाचे सडे बघायला जंगलात येतात तसे हेच जंगल वाचवायला जानेवारी ते जून या आगीच्या मोसमात वणवा प्रतिबंध करायला देखील या.चला तर मग होणार ना सहभागी या पर्यावरणाच्या रक्षणात. वणवा दिसल्यास टोलफ्री हेल्पलाईन 1926 ला कॉल करा.असे देखील यावेळी आव्हान करण्यात आले.

Comments
Post a Comment