डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त ह्युमन राईट फॉउंडेशन ऑफ भारत कमिटीचे वतीने पुष्पहार अर्पित करून केले अभिवादन.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती निमित्त ह्युमन राईट फॉउंडेशन ऑफ भारत कमिटीचे वतीने पुष्पहार अर्पित करून केले अभिवादन.
सातारा 24तास न्यूज. प्रतिनिधी. अकबर भालदार.
फलटण येथे ह्युमन राईट फॉउंडेशन भारत कमिटीचे महाराष्ट्र अध्यक्ष मा.रणधीरजी भोसले. जिल्हा अध्यक्ष बबनराव मदने उर्फ नाना यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वभूषण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एस. सी, एसटी, ओबीसी, भटके विमुक्त, शोषित पीडित विद्यार्थांच्या शिक्षण विषयक क्रांतीचे तत्वज्ञान. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणविषयक धारणा अशी होती की, व्यक्तीच्या विकासासाठी शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. शिक्षणामुळेच दलित, पीडित, शोषित वर्गाची अवहेलना,हालअपेष्टा, मानहानी थांबवून त्यांच्या विकासाची प्रगती होऊन शासन, प्रशासनात त्यांना सेवेच्या संधी उपलब्ध होतीलच परंतु त्याचबरोबर शासनाच्या प्रशासनाचे धोरणत्मक निर्णय प्रभावित करण्यासाठी बळ मिळून त्यांच्या विकासाला चालना मिळेल, याच हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "सर्वांना सक्तीच्या मोफत शिक्षणाचा "सतत आग्रह धरला होता.बाबासाहेब जेव्हा परदेशात शिक्षणासाठी परदेशात गेले, तेव्हा त्यांनी तेथील प्रशासन व्यवस्था, बौद्धिक जीवनाचा अभ्यास करून, ज्यावेळी आपला देश स्वतंत्र होईल, तेव्हा आमच्यासह जे मागास आहेत त्या सर्वांचे मानवी हक्क केवल शिक्षणानेच शाबूत राहतील याबाबत त्यांना आत्मविश्वास होता. शिक्षणातील दलित, शोषित पीडित बांधवांच्या दुर्लक्षितपणाची सतत जाणीव होत होती, त्यामुळे त्यांनी शिक्षणाचा प्रचार व प्रसारासाठी त्यांनी शक्य त्या प्रत्येक साधनाचा उपयोग केला.1924मध्ये "बहिषकृत हितकारिणी" स्थापन करण्यामागील त्यांचा प्रमुख उद्देश एव्हडाच होता की या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वसतिग्रह सुरु करून दलित, शोषित समाजात शिक्षणाचा प्रचार, प्रसार करणे, वाचनालये, समजकेंद्रे किंवा अभ्यास मंडळे, इत्यादी संसाधनाचा उपयोग करून दलित समाजात सांस्कृतिक प्रचाराचे परिचालन करणे, शिक्षणाला या संस्थेमार्फत प्राधान्य देऊन हा समाज शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या विकसित करण्यास प्राधान्य, हा मुख्य उद्देश होता. "शिक्षण ही आजची मोठी गरज असून 'वेळ आली तर उपाशी रहा, पण लेकरांना शिकवा ', असे ते दलित, पीडित समाजास वेळोवेळी त्यांच्या भाषणातून लोकांना उपदेश करीत असत.
यामुळे या कार्यक्रम प्रसंगी ह्युमन राईट फॉउंडेशन भारत कमिटीचे कायदेशीर सल्लागार ऑड. मनोज जावळेकर. फलटण ता. अध्यक्ष आनंद भोसले. जिल्हा सेक्रटरी राजाभाऊ मदने. शकील सय्यद. धर्मेद्र चव्हाण महाराज. प्रवीण अहिवळे.निशिकांत अहिवळे.खटाव ता. अध्यक्ष अकबर भालदार.मोहन अलगुडे.सुरेश अडागळे.जनार्धन बेंद्रे.सूर्याजी जगताप.आदी मान्यवर यांच्या उपस्तितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Comments
Post a Comment