Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सात कलमी कृती कार्यक्रम.

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सात कलमी कृती कार्यक्रम. सोनवडी प्रतिनिधी, दिलावर शेख. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या. याकरिता सात कलमी कृती कार्यक्रम निश्‍चीत करण्यात आला. या सूचनांवर काय कार्यवाही केली गेली याबाबत १५ एप्रिल २०२५ रोजी आढावा घेतला जाईल.या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.बैठकीदरम्यान मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी खालील निर्देश दिले. ✅कार्यालयाच्या संकेतस्थळांवर माहिती अद्ययावत करा, सायबर सुरक्षितता सुनिश्चित करा. माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या. ✅शासकीय कार्यालये स्वच्छ ठेवा, अनावश्यक कागदपत्रे आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करा ✅शासकीय कार्यालयात पिण्याचे पाणी, स्वच्छ प्रसाधनगृह राहील यांची खात्री करा. अधिकाऱ्या...

आपले सरकार सेवा पोर्टल'द्वारे दिल्या जाणार्‍या सेवांमध्ये वाढ करा.

Image
आपले सरकार सेवा पोर्टल'द्वारे दिल्या जाणार्‍या सेवांमध्ये वाढ करा. नि. संपादक, बबनराव मदने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेत राज्य सेवा हक्क आयोगाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संबंधित अधिकार्‍यांना महत्त्वाचे निर्देश दिले. राज्यातील नागरिकांना आवश्यक त्या सेवा सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने 'आपले सरकार सेवा पोर्टल'द्वारे सद्यस्थितीत ५३६ ऑनलाईन सेवा दिल्या जात आहेत, त्याचा नागरिकांना व्यापक प्रमाणात उपयोग होत आहे. या पार्श्वभूमीवर या ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.गतिमान पारदर्शक कार्यपद्धतीच्या दृष्टीने लोकांना उपयुक्त ठरत असलेल्या 'आपले सरकार सेवा पोर्टल' द्वारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. अधिक सक्रियतेने आणि सुलभरित्या व्यापक स्वरुपात या पोर्टलद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाईन सेवा उपलब्ध होतील, यादृष्टीने नियोजन करण्याचेही निर्देश यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक...

वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, महसूल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला निर्देश.

Image
वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, महसूल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला निर्देश. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने  पुढील १०० दिवसांमध्ये करावयाच्या कामांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेत बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे '१०० दिवसीय नियोजन आराखड्या'च्या अनुषंगाने महसूल व मुद्रांक शुल्क, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि राज्य उत्पादन शुल्क या विभागांची बैठक संपन्न झाली. शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक सेवा अद्ययावत करून त्या अधिक दर्जेदार द्या, वैद्यकीय शिक्षणअंतर्गत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांचे बळकटीकरण करा, अॅलोपॅथी औषध निर्माते, रक्तपेढ्या, शासकीय रुग्णालयातील सर्व औषधांच्या नमुन्यांची गुणवत्ता तपासणी, दुध भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला दिले. याशिवाय क्षयरोग मुक्त भारत अभियानामध्ये महाराष्ट्राने नेतृत्व करावे, स्तन व गर्भाशय कर्करोग निदान करण्यासाठी मोहीम राबविण्यात यावी, रुग्णवाहिका खरेदीच्या न्या...

महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई - कॅबिनेटप्रणाली लागू करण्याचा निर्णय :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई - कॅबिनेटप्रणाली लागू करण्याचा निर्णय :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या प्रशासनात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त करण्याकरिता ई-कॅबिनेट प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) ने विकसित केलेल्या 'ई कॅबिनेट' प्रणालीचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण केले. *'ई कॅबिनेट'ची प्रमुख वैशिष्ट्ये:* ✅आयसीटी आधारित या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणावर होणारा वापर कमी होणार आहे ✅मंत्रिमंडळ सदस्यांसाठी सुलभ डॅशबोर्ड उपलब्ध होईल त्याचबरोबर संदर्भ शोधणे, कृती बिंदू (ॲक्शन पाईंट) पाहणे, निर्णयांचे पुनरावलोकन करणे सुलभ होईल. ✅ई-कॅबिनेटमुळे मंत्रिमंडळ बैठकांचे, निर्णयांचे व त्यासंबंधीच्या दस्तऐवजांचे जतन होईल. ✅पारंपरिक मंत्रिमंडळ बैठकांमध्ये येणाऱ्या विविध अडचणींवर या प्रणालीमुळे मात करता येईल. ✅मंत्रिमंडळासमोर चर्चा आणि निर्णयासाठी प्रस्ताव सादर  आणि अंतिम निर्णय घेणे ही प्रक्रिया सुलभ होईल ✅पारंपरिक बैठकींतील कागदपत्रांच्या वितरण...

देशभरातील पत्रकार, संपादकांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय पत्रकार महासंघ.संपादक व माध्यम तज्ञ राजा माने यांची पत्रकार दिनी मुंबईत घोषणा.

Image
देशभरातील पत्रकार, संपादकांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय पत्रकार महासंघ.संपादक व माध्यम तज्ञ राजा माने यांची पत्रकार दिनी मुंबईत घोषणा. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक  यांच्या न्याय हक्कांसाठी  संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ राजा माने यांनी आज मराठी पत्रकार दिनाच्या औचित्याने राष्ट्रीय पत्रकार महासंघाची स्थापना झाल्याचे घोषित केले. महाराष्ट्रातसह देशभरातील माध्यमातील सर्व पत्रकार, संपादक व विविध पत्रकार संघटना यांचा या महासंघामध्ये समावेश असणार असून पत्रकार, संपादकांच्या विविध समस्या व न्याय हक्कासाठी ही संघटना देशभर काम करणार आहे. यावेळी बोलताना राजा माने म्हणाले, ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांना व विविध दैनिक, साप्ताहिकांच्या संपादकांना एकत्र करून राष्ट्रीय पत्रकार महासंघ देशभरात उत्तम संघटन करणार आहे. साप्ताहिक दैनिक यांच्या समोर असलेल्या विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय पत्रकार महासंघ काम करणार आहे.  पत्रकार संपादक यांच्यासह संघटनांचा सहभाग  राजा माने यांनी आज घोषित केलेल्या राष्ट्रीय पत्रकार...

सौ.स्वाती गायकवाड राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित.

Image
सौ.स्वाती गायकवाड राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव ता.फलटण येथे कार्यरत असलेल्या उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षिका सौ. स्वाती महेंद्र गायकवाड यांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था अविष्कार फौंडेशन, इंडिया (कोल्हापूर, महाराष्ट्र )यांचे मार्फत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दिला जाणारा सन 2025 चा राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार नुकताच शिरवळ येथे प्रदान करण्यात आला. केनिया येथील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुवर्णपदक विजेता  धावपटू मा. श्री केनिथ कीर्तीजी, माजी उपकोषागार अधिकारी, मा. श्री जयकुमार  खरात, यशदा ट्रेनर मा.श्री विवेक गुरव तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  लोकसहभागातून शाळेचा कायापालट करणे, क्रीडा क्षेत्रात दर्जेदार विद्यार्थी घडवणे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमात...

पडेगाव येथील शेतकऱ्यांची कृषीदुतान सोबत फलटण येथील कृषी प्रदर्शनास भेट.

Image
पडेगाव येथील शेतकऱ्यांची कृषीदुतान सोबत फलटण येथील कृषी प्रदर्शनास भेट. सोनवडी प्रतिनिधी, दिलावर शेख. पाडेगाव ता.खंडाळा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदुतां सोबत ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२०२५ कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांनी फलटण येथील कृषी प्रदर्शनास भेट दिली.फलटण येथे दि.२ जाने. ते ६ जाने. दरम्यान श्रीमंत मालोजीराजे भव्य कृषि प्रदर्शनाद्वारे कृषि क्षेत्रातील नवीन संशोधित व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांनी घेतली.तसेच नामांकित ट्रॅक्टर कंपन्या, शेतीची अवजारे, सेंद्रिय शेती, पशू संवर्धन व संगोपन, डेरी, पोल्ट्री, पॉली हाऊस, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, बीज व रोपे, रोपवाटिका, जैविक तंत्रज्ञान, कृषि उपयोगी पुस्तके, कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान यांची माहिती प्रदर्शनात एकाच ठिकाणी मिळाली. या कृषि प्रदर्शना दरम्यान विविध विषयांवर चर्चा सत्रांचेही आयोजन करण्यात आले होते, त्या मध्ये शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, भरड धान्याचे महत्व, कृषि उद्योजकता विकास, दुग्ध व्यवसाय...